गोंदिया: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखत श्री. लायकरामजी भेंडारकर यांची अध्यक्षपदी तर श्री. सुरेशजी हर्षे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर विविध राजकीय स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की, “गोंदिया जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची प्रमुख संस्था असून, या नव्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेतीविकास यावर विशेष भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.”
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर विजय मिळवला. या निवडीनंतर भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या निवडीनंतर विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. नव्या नेतृत्वाकडून जिल्ह्यातील विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.
