सडक अर्जुनी | वार्ताहर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सडक अर्जुनी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विशेष प्रसंगी आमदार राजकुमार बडोले यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा-गोंदिया समन्वयक श्री. विरेंद्रजी अंजनकर, पंचायत समिती सभापती श्री. चेतनजी वळगाये, पंचायत समिती सदस्य श्री. अल्लाउद्दीनजी राजानी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मुबीनजी शेख व उपाध्यक्ष ममताताई राजगीरे यांची उपस्थिती होती. याशिवाय श्री. अभयजी गहाणे, श्री. प्रविणजी यावलकर, श्री. दिनेशजी खेडकर, श्री. अनिरुद्धजी केंद्रे, करिश्माताई खोब्रागडे, सिमाताई गहाणे, अनिताताई प्रधान, कामीनीताई कोवे, संजयजी प्रधान आदी मान्यवरही उपस्थित होते.
मुख्याध्यापक कावळे मॅडम व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीते व भाषणांद्वारे उपस्थितांचे मन जिंकले.
यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची महत्त्वाची भूमिका समजावून सांगितली. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता विविध कौशल्ये आत्मसात करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. शिक्षणासोबत क्रीडा आणि संस्कृतीही महत्त्वाची आहे.”
पंचायत समिती सभापती चेतनजी वळगाये यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शाळेच्या विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनमोकळ्या संवादातून आपले अनुभव मांडले. संपूर्ण स्नेहसंमेलन एक आनंददायी व प्रेरणादायी क्षण बनला.
