अर्जुनी मोरगावच्या तावसी येथील साई श्रध्दा लॉनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या विजयासाठी निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला.
बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, ज्यात सिंचन, शेती, रोजगार, पर्यटन विकास, तसेच महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजनांच्या अविरत चालू ठेवण्यावर भर देण्यात आला. कोणत्याही भेदभावाशिवाय एकजुटीने काम करून श्री बडोले यांना विधानसभेत बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांनी आपले प्रयत्न एकत्रित करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राजकुमार बडोले, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, यशवंत गणवीर, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, नारायण भेंडारकर, दाणेश साखरे, उद्धव मेहंदळे, योगेश नाकाडे, मंजूषा बारसागडे, सुशीला हलमारे, सुशीला राऊत, घनश्याम मेहता, राकेश जायस्वाल, किशोर ब्राह्मणकर, आम्रपाली डोंगरवार, हर्षा राऊत, लता दृगकर, निशाताई मस्के, नागपुरे ताई, रतिराम राणे, सागर आरेकर, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा, माधुरी बनपूरकर, अनिशा पठाण तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- “औरंगजेबाच्या कबरीभोवती वादाचा धुरळा! काय होणार पुढे?”औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. साधी राहावी अशी औरंगजेबाची शेवटची इच्छा होती, पण त्याची कबर आज भव्य मकबऱ्यात बदलली आहे. काही जणांसाठी ती दडपशाहीची खूण आहे, तर काहींसाठी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक! कायद्यातील अडथळे, केंद्र सरकारचा अधिकार, आणि वाढत्या सामाजिक-राजकीय तणावामुळे हा विषय अधिकच गडद होत चालला आहे. कबर हटवता येईल का, आणि सरकार यावर काय निर्णय घेणार — हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!
- राज ठाकरेंची ‘खोक्याभाई’ टीका; आशिष शेलार यांचे जोरदार प्रत्युत्तर“एक खोक्याभाई काय घेऊन बसलात?” या राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे आशिष शेलार यांनी कडवट प्रत्युत्तर देत, “ज्यांना लोकसभेत जागा मिळत नाही, ते बाहेर बसून विधानं करतात,” असा टोला लगावला. या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
- राज्यातला एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डावएसएससी बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असून, त्यांनी राज्य सरकारला शिक्षणविषयक धोरणावर पुन्हा विचार करण्याची मागणी केली आहे.
- वाळू तस्करी : महसूलमंत्र्यांचे विभागीय चौकशी आदेश धडकले; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यतावैनगंगा आणि बावनथडी नदीतून सुरू असलेल्या वाळू तस्करीचा पर्दाफाश झाला असून महसूलमंत्र्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुचाकीवर लावले जाणारे जिओ टॅग महाराष्ट्र सीमेपर्यंत आणून ट्रक व टिप्परला लावण्याची शक्कल उघड झाली असून यामुळे मोठ्या नावांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- अनुष्का शर्मा ने सांगितली घाटस्पोटाची कारणेबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटांचे वाढते प्रमाण यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. अनुष्काने म्हटले की, “आजच्या काळातील महिला आपल्या जोडीदारासोबत समांतरपणे वाढू इच्छितात. त्या कोणत्याही दबावाखाली जगायचं मानत नाहीत. महिला आता जास्त सहन करीत नाहीत आणि त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे.” तिच्या या विधानावर समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुष्काच्या मते, नात्यात पारदर्शकता आणि समानतेचा अभाव असल्यास नातेसंबंध तुटू शकतात.