मानेगाव सडक येथे छत्रपती संभाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने वैचारिक शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीमती आशाबाई सिंगनजुडे यांच्या प्रमुखपदी उद्घाटन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नरेंद्र भांडारकर, मंगेश मेश्राम, प्रशांत गायधने, हरिभाऊ खवास, योगेश सिंगनजुडे, पंकज चेटुले सह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. जि. प. प्राथमिक शाळा व ए.आय.एम पब्लिक स्कुल मानेगाव/सडक या शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, पोवाडे, शिवगीते सादर करून सणाला वैचारिक आणि सांस्कृतिक छटा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णा गायधने, नेहाल कांबळे, सोनूलाल माकडे, विशाल रोकडे, आकाश निखाडे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना साजरा करून समाजात एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
