अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री व विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी 207 व्या शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केले. बडोले यांनी शौर्यदिनाच्या निमित्ताने शहीदांच्या बलिदानाचे स्मरण केले व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यकर्त्यांचे उत्स्फूर्त स्वागत
विजयस्तंभ परिसरात आमदार बडोले यांचे स्थानिक कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषाच्या वातावरणात त्यांचे आगमन झाले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आमदार बडोले यांचे अभिनंदन केले व त्यांच्यासोबत शौर्यदिन साजरा केला.
शहीदांच्या स्मरणाने भारावलेले मनोगत
विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करताना बडोले यांनी शहीदांच्या महान त्यागाचा उल्लेख केला व ते ऐतिहासिक क्षण स्मरणात ठेवण्याची गरज अधोरेखित केली. आपल्या मनोगतात ते म्हणाले,
“भीमा कोरेगावचा विजय हा केवळ ऐतिहासिक घटनाच नाही, तर सामाजिक समतेचा आणि संघर्षाचा प्रतीक आहे. आपल्या शूरवीरांच्या कर्तृत्वाचा आम्हा सर्वांना अभिमान असून, या शौर्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.”
या अभिवादन यात्रेमुळे सामाजिक एकोपा आणि ऐतिहासिक वारशाची आठवण अधिक दृढ झाली.
बडोले यांच्यासोबत लार्ड बुद्धा टिव्ही चे सचीन मून, सर्जेराव वाघमारे, विनोद आव्हाड, गजेंद्र गवई, सदाशिव गच्छे,विवेक बनसोडे नॅशनल दलित मुवमेंट च्या श्रीमती पंचशीला कुंभरकर व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.जनतेत नवा उत्साह निर्माण करणारा ठरला.