लाठी खाऊ गोळी खावू, विदर्भ राज्य मिळवून घेवू

0
19


लाखांदूर
विदर्भ राज्य आंदोलन समिती मुख्यालयी पार पडलेल्या बैठकीच्या निर्णयानुसार 2023 संपेपर्यंत विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ मिळवू औंदा या मागणीची पूर्तता करण्याकरीता ‘लाठी खाऊ गोळी खावू, विदर्भ राज्य मिळवून घेवू’ असा निर्धार व्यक्त करण्यात आला. आता आरपारच्या लढाईची सुरवात 19 डिसेंबर रोजी होणार असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळावर ‘हल्लाबोल आंदोलन’ केले जाणार आहे. हल्लाबोल आंदोलनात अकरा जिल्ह्यातील 120 ही तालुक्यातून 10 हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत व महाराष्ट्रवादी चले जावो अशी घोषणा विधान मंडळावरील आंदोलनात करणार आहे.
महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असून शेतकèयांच्या भूअर्जन केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याकरिता 65 हजार कोटींचे कर्ज एम.एस.आर.डी.सी. ला उभे करावे लागत आहे व त्याला थकहमी ही सरकारची आहे. आधीच 6 लाख 60 हजार कोटींचे कर्ज थकहमी व लायबिलिटीच्या डोंगराच्या बोझ्याखाली असलेले महाराष्ट्र राज्य कदापीही सक्षम होऊ शकत नाही. म्हणून विदर्भातील जनता महाराष्ट्रात 100 वर्षे राहली तरी त्यांच्या अनुशेष भरून निघू शकत नाही. या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर ते म्हणजे ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य’. त्यासाठी 19 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नागपुरातील यशवंत स्टेडीयम वरून हल्लाबोल आंदोलनाला सुरूवात होणार असून पंचशील चौक-झांशी राणी चौक-व्हेरायटी चौक-विधान भवन या मार्गाने आगेकूच करणार आहे. या आंदोलनाला विदर्भ माझा, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, कुणबी बहूजन पार्टी, भीम आर्मी संरक्षक दल आदी पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला असून विदर्भातील अकराही जिल्हात या आंदोलनाला विविध पक्ष व संघटनाद्वारे मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तात्काळ व्हावी, विजेची दरवाढ राज्य सरकारने मागे घ्यावी, शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करून शेतकèयांना 24 तास तास वीज देण्यात यावी, वैधानिक विकास मंडळ नको-विदर्भ वेगळे करावे, विदर्भातील 11 ही जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे, बल्लारपूर-सुरजागढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणी करण्यात येणार असल्याचे लाखांदूर येथे बोरकर कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेला अरुण केदार, मुकेश मासूरकर, रेखा निमजे, मनिषा पुंडे, मोरेश्वर बोरकर, विश्वपाल हजारे, विजय जाधव, लक्ष्मण देंडवाल, मानबिंदू दहिवले, रामचंद्र तारोने आदी उपास्थित होते.
…..

Spread the love
JB\'s, Modi Complex, College Road, Sakoli-8275112833

Leave a Reply