तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये : आ. राजू कारेमोरे

0
19

मोहाडी
महागाईच्या काळात तरुणांनी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले परिवार उध्वस्त करू नये, असे मार्गदर्शन आ. राजू कारेमोरे यांनी केले.
निलज/बु. येथे शिवभक्त श्री शेषराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. ते म्हणाले, आपण महगाईच्या काळात सुद्धा व्यसनाच्या आहारी जाऊंन आपले परिवार उद्धवस्त करीत आहोत, यावर आळा घालायला पाहिजे. जेणेकरून आपण आपले परिवाराला व मुलाबाळांना चांगले संस्कार देऊ शकू. आपण जर आपल्या मनामध्ये विचार केला तर एक चांगले जीवन आपण जगू शकतो. आपण पाहत आहात व्यसनामुळे बरेच आजार आपल्याला होत असतात आणि त्यातून आपण बाहर निघण्याकरीता हॉस्पिटलमध्ये भर्ती होऊन आपले जीव वाचावे म्हणून पैसे खर्च करून प्रयत्न करीत असतो, परंतु कुठे यश मिळते तर कुठे मिळत नाही. त्याकरिता अगोदरच आपण ठामपने एक संकल्प करूया की आजपासून आपण कोणतेही व्यसन करणार नाही व माझ्या पासून माझ्या परिवाराला आणि माझ्या संबधित लोकांना त्रास होऊ देणार नाही. असे जनतेला संबोधित करतानी सांगितले. याप्रसंगी आयोजकांनी आ. राजू कारेमोरे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी माजी खासदार मधूकर कुकडे, सभापती रितेश वासनिक, जि. प. सदस्य महादेव पचघरे, नरेश ईश्वरकर, एकनाथ फेंडर, पंचायत समिती सदस्य उमेश भोंगाडे, प्रिती शेंडे, वंदना सोयाम, के.के. पंचबुध्दे, चंदू सेलोकर, महादेव फुसे, भाऊदास साठवने, शेंडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.
…..

Spread the love
JB\'s, Modi Complex, College Road, Sakoli-8275112833

Leave a Reply