भंडारा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांच्या निर्देशानुसार शाळा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिकासाठी स्थानिक लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय (मन्रो) ची निवड करण्यात आली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती, नगर परिषद व होमगार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने लाल बहादूर शास्त्री विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक करण्यात आले. याकरिता मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे विपूल नकूम, भंडारा होमगार्ड कार्यालयातील सुभेदार रवींद्र रघाताटे, मुख्याध्यापक एम.एम. चोले उपस्थित होते. पुणे येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण केलेले आपत्ती व्यवस्थापन नोडल अधिकारी यांनी आपत्तीच्या काळात करावयाचे बचाव कार्य, शोध मोहिम, प्रथोमोपचार, अग्नीशमन इत्यादीचे महत्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांचा सहकार्याने आपत्ती प्रात्यक्षिक करण्यात आले. संचालन कनिष्ठ व्याख्याता एम.एस. मुदलियार यांनी तर प्रास्ताविक नायक रिजवान रशिदखान पठाण यांनी केले.
यशस्वीतेकरिता गणेश मस्के, देविदास काकडे, श्यामराव पाटेकर, सेलोकर, ऊके, महिला होमगार्ड लांजेवार, चव्हाण, फुले, सार्वे, शाळेचे शिक्षक सुनील खिलोटे, शरद बडवाईक, विजय बांगडकर, स्मिता गालफाडे, निता भोंगाडे, विना सिंगनजुडे, निता भोंगाडे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
…..