भंडारा
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातंर्गत मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रावर 3 व 4 डिसेंबर रोजी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. परंतु 4 डिसेंबर रोजी रविवार असल्याचे पाहून भंडारा शहरातील काही मतदान केंद्र कुलूपबंद दिसून आले. त्यामुळे नवमतदारांना नोंदणी अभावीच परतावे लागले.
मतदार यादीमधील मयत मतदार, कायम स्थलांतरीत मतदार, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांचे नाव वगळणे, लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दुबार नोंद असलेल्या मतदारांची नावे कमी करणे व ज्यांचे 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्याकडून नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज घेणे, आदी कामे या शिबिरात करण्यात येणार होते. मात्र 4 डिसेंबर रोजी भंडाèयातील प्रभाग क्रमांक 6 मधील जकातदार कन्या शाळा, नूतन कन्या शाळा, बेसिक प्रायमरी शाळा, जिजामाता विद्यालय हे मतदान केंद्र बंद होते. या सर्व मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदान होत असते. केंद्र बंद असल्याने मतदारांना नोंदणी करता येऊ शकली नाही तसेच सदर केंद्रावर अधिकाèयांची अनुपस्थिती होती.
एकीकडे जास्तीत जास्त मतदारांनी जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना मतदान केंद्र असे बंद राहत असल्याने नोंदणी अभियान केवळ कागदीपत्री किंवा प्रसिध्दीकरिताच का? असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
……