लाखनी
तालुक्यातील बरडकिन्ही व रामपुरीसह अनेक गावातील धानाचे पुंजने, ऊस शेती व तमर पिकांचे हत्तीच्या कळपाने नुकसान केले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता यांनी पाहणी करून वनाधिकाèयांशी संवाद साधला. तसेच हत्तीच्या कळपाचे लोकेशन आणि पश्चिम बंगालवरून आलेल्या पथकाशी चर्चा करून पुढील योजनेबाबत चर्चा केली.
आठवडाभरापासून हत्तीचे कळपाकडून लाखनी व साकोली वनपरिक्षेत्राचे सीमावर्ती भागातील रामपुरी व बरडकिन्हीसह रेंगेपार/कोहळी, चीचटोला, शिवणी, नान्होरी, गडपेंढरी तसेच अड्याळ वन परिक्षेत्रांतर्गत येणाèया पेंढरी, चान्ना, धानला परिसरात हौदोस घातला आहे. येथील वन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनीतील धानाचे पुंजने, मळणी केलेल्या धानाचे बोरे, ऊस वाडी, ऊस बीज निर्मिती तसेच तूर पिकाची प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. नुकसान टाळण्यासाठी वनाधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत आहे. याकरिता जनजागृतीही करण्यात येत असून हत्तीच्या कळप असलेल्या वनक्षेत्रात सरपणासाठी जाऊ नये, मोहफुलाची योग्य ती विल्हेवाट लावावी, दारू पिऊन हत्तीच्या संपर्कात येऊ नये, हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये अशा सूचना ग्रामस्थांना केल्या जात आहेत. तसेच परिसर सील करून जीवितहानी टाळण्यासाठी ये-जा करण्यास मज्जाव केला जात आहे.
वनविभागामार्फत केलेल्या उपाययोजना व नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, उपसंचालक नवेगाव-नागझिरा जेफ, भंडाराचे उपवन संरक्षक राहूल गवई, गोंदियाचे उपवन संरक्षक कुलराज सिंग, साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड, वन्यजीव सहाय्यक वन संरक्षक पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, शेखर मेंढे, क्षेत्र सहाय्यक जे.एन. बघेले आणि वन कर्मचाèयांसह नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी केली. तसेच पश्चिम बंगाल वरून आलेल्या चमूसोबत उपाययोजनेबाबद चर्चा केली.
…..