साकोली
येथील मोना एग्रो इंडस्ट्रिज या गूळ कारखान्याचा गाळप हंगाम 5 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. या कारखान्यामार्फत उस उत्पादकांना 2500 रुपये टन प्रमाणे उसाचा भाव देण्यात येत आहे. 50 टन उस गाळपाची क्षमता असून 16 तारखेपर्यंतच्या क्षमतेच्या उस खरेदीची नोंदणी झाली असल्याचे संचालक अरुण गुप्ता यांनी सांगितले.
मोना एग्रो इंडस्ट्रिजतर्फे शेतकèयांना नगदी चुकारा देण्यात येत असल्याने तसेच चोख वजन काटा होत असल्याने उस उत्पादकांकडून या कारखान्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 18 वर्षापासून शेतकèयांना सेवा देत असलेल्या कारखान्याचा सचोटी व विश्वासनियतेमुळे शेतकरीही येथे उस विकण्यास प्राधान्य देत आहे. यावर्षी मार्च महिन्यापर्यंत उसाचे गाळप सुरू ठेवण्याचा मानस आहे. शक्य त्या सोयी शेतकèयांना उपलब्ध करून देऊ तसेच नोंदणी क्रमांकानुसार शेतकèयांनी उस आणला तर त्यांचा काटा त्वरित करण्याची व्यवस्था असल्याने अधिक प्रतिक्षा करावी लागणार नसल्याचे ज्येष्ठ संचालक गंगासागर गुप्ता यांनी सांगितले.
मोना अॅग्रो कारखान्यात हर्बल पध्दतीने गूळ, गूळ पावडर, गुळाचे बट््््टी व इतर उत्पादन होत असून यांच्या गुळास विदर्भात नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ व इतर राज्यातूनही मागणी आहे, हे उल्लेखनीय.
……