तुमसर
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा राजपत्रित 2019 यावर्षीची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या भूषण मदनकरची 2022 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी-2 या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले. तुमसर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी दिलेल्या आर्थिक मदतीने हनुमान नगर येथील भूषण नंदकिशोर मदनकरला मोठ बळ मिळाले अन् त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यामुळे भूषनने त्यांचे आभार मानले.
भूषणचे वडील मोलमजुरी करून कुटुंबियांचे उदरनिर्वाह करतात. शिक्षण घेण्यासाठी भूषणच्या घरची आर्थिक परिस्थिती अडसर होती. भूषणला अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठीे समाजातून मदतीचे काही हात पुढे येण्याची नितांत आवश्यकता होती. अश्यावेळी इंजि. प्रदीप पडोळे यांनी भूषण मदनकरला उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार दिला. भूषणचा संपूर्ण शिक्षणाची जवाबदारी घेऊन त्याला आर्थिक मदत केली. तो जळगाव येथे शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश केला होता व तेथून त्याने ब्याचलर ऑफ टेक्नॉलॉजी (स्थापत्य अभियांत्रिकी) शिक्षण घेऊन परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली होती. त्या शिक्षणासाठी केलेल्या मदतीने तो निश्चितच त्याचा ध्येय गाठण्यात यशस्वी झाला आहे.
1 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे शासनाच्या विविध विभागात निवड झालेल्या अभियंत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये भूषण मदनकर याचाही समावेश होता. आपल्या शिक्षण घेण्याकरिता केलेल्या मदतीसाठी माजी नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांच्या निवासस्थानी जाऊन भूषनने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.
……