तुमसर
माझ्या नातेवाईकांना आपल्या घरी का ठेवले म्हणून संपूर्ण कुटुंबियाला जीवे मारण्याच्या उद्देशाने महिलांच्या अंगावर चारचाकी वाहन चढवून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर पुरुषाला प्रचंड मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री तुमसर तालुक्यातील साखळी (पोवार) येथे घडला. या हल्लात लतिका दिलीप बोरकर (50), वृषाली अरुण कुंभले (19) व लच्छू हरी कुंभले (38) हे गंभीर जखमी झाले आहेत.
साखळी येथे कुंभले कुटूंब वास्तव्यास असून त्यांच्याकडे काही दिवसापासून वृषाली कुंभले व लच्छू कुंभले हे राहत होते. शनिवारी रात्री वृषालीचा नातेवाईक आरोपी लक्ष्मण हा त्याच्या तीन साथीदारांसोबत वाहन क्रमांक एमएच 31/इए 6199 ने फिर्यादी लतिका बोरकर यांच्या घरी आला. यावेळी लतिका यांचा मुलगा आनंद बोरकर याला घराबाहेर बोलावून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून लतिका व वृषाली हे बाहेर घराबाहेर आले असता त्यांच्या अंगावर गाडी चढवून चिरडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात दोघेही महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाèयांनी धाव घेतली. यावेळी गाडीखाली फसलेल्या लतिका व वृषाली यांना बाहेर काढून पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रसंगी आरोपी लक्ष्मण व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. शेजाèयांनी जखमींना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले. लतिका हिच्या पायाला व वृषाली यांच्या चेहèयाला, कमरेला, हाताला व पाठीला गंभीर दुखापत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान लतिका व वृषाली यांना शेजाèयांनी दवाखान्यात नेल्याचे समजताच आरोपी लक्ष्मण व त्याचे साथीदार शस्त्रांसह गावात पुन्हा दाखल झाले. यावेळी घरात एकटे असलेले दिलीप बोरकर यांच्यावर त्यांनी हल्ला करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. प्रसंगी घरातील संपूर्ण साहित्याची तोडफोड करून तिथून निघून गेले. या प्रकरणी फिर्यादी लतिका बोरकर यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी भांदवीचे कलम 337, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी लक्ष्मणला अटक केली.
……