आदिवासी बिरसा मुंडा समिती खोबा यांच्या वतीने ग्राम शाखा खोबा/हलबी येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सवानिमित्त समाज प्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात आमदार राजकुमार बडोले यांनी बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारक कार्याचा गौरव करत, आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी सामाजिक ऐक्य व प्रगतीसाठी सामूहिक सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांतजी धानगाये, सरपंचा सौ. कीसणाताई राऊत, श्री. सत्यवानजी गजभिये, श्री. डिलेशजी सोनटक्के, श्री. छगनजी घरत, श्री. डालिमकुमार हत्तीमारे, माजी सरपंच श्री. फुलचंदजी कापगते, कीर्तनकार सौ. मुक्ताबाई हत्तीमारे, श्री. मुकुंदाजी बोरघरे, श्री. संजयजी कुरसुंगे, श्री. अविनाशजी बोरघरे, श्री. शिवलालजी घरत, श्री. महेशजी मेळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी बिरसा मुंडा समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
