Monday, March 24, 2025

मुख्य वार्ता

“औरंगजेबाच्या कबरीभोवती वादाचा धुरळा! काय होणार पुढे?”

औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. साधी राहावी अशी औरंगजेबाची शेवटची इच्छा होती, पण त्याची कबर आज भव्य मकबऱ्यात बदलली आहे. काही जणांसाठी ती दडपशाहीची खूण आहे, तर काहींसाठी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक! कायद्यातील अडथळे, केंद्र सरकारचा अधिकार, आणि वाढत्या सामाजिक-राजकीय तणावामुळे हा विषय अधिकच गडद होत चालला आहे. कबर हटवता येईल का, आणि सरकार यावर काय निर्णय घेणार — हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!

राज्यातला एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव

एसएससी बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असून, त्यांनी राज्य सरकारला शिक्षणविषयक धोरणावर पुन्हा विचार करण्याची मागणी केली आहे.
spot_imgspot_img

नागपूरात हिंसाचार, वाहणे जाळली, रात्रीची घटना

नागपूरमधील हिंसाचार 17 मार्च 2025 रोजी महल भागात घडला, जिथे दोन गटांमधील वादामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत दोन वाहने जाळण्यात आली, पथराव झाला, आणि एका फोटोचे जाळले जाणे अहवालात नमूद केले. ही घटना संध्याकाळी 8 ते 8:30 च्या सुमारास घडली, ज्यामुळे परिस्थिती बिकट झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अश्रुधूर आणि बलाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली, तसेच 144 कलम लागू केले.

सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले

"प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते. मजुराची हजेरी तयार करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक खुमेश भोजराज वघारे याने 1200 रुपयांची लाच मागितली. गोंदिया एसीबीने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले."

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला -परब

"छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला. मी सगळं भोगलं, पण मी पक्ष बदलला नाही. याचा मला अभिमान आहे. ज्यांनी पक्ष बदलला, ते आता आम्हाला संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहेत," असे अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना म्हटले.

विधानसभा अधिवेशनात आमदार राजकुमार बडोले यांची आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी ठोस मागणी

आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे, सुविधांचा अभाव आणि ग्रामीण भागात कॅन्सरच्या वाढत्या आजारावर चर्चा करून सरकारकडे ठोस उपाययोजनेची मागणी केली.

विज्ञान भवनातील भाषणानंतर मोदींवर टीकेची झोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवनातील उद्घाटन कार्यक्रमात मराठी भाषा संस्कृतपासून आलेली असल्याचे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरही अशा प्रकारचे विधान करणे योग्य नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वाघांवर पुन्हा संकट: संरक्षणाच्या प्रतिबद्धतेवर प्रश्नचिन्ह

"भारताची ओळख असलेल्या वाघांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण देशाला एकत्र यावे लागेल. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 25 हून अधिक वाघांची शिकार झाल्याने जंगलातील राजाच्या भविष्यासाठी धोका निर्माण झाला आहे. शिकारी टोळ्यांचे पुनरागमन, वनखात्याचे अपयश, आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि मानवी अतिक्रमण यामुळे वाघांच्या अस्तित्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कठोर कायद्यांची अंमलबजावणी, आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग याशिवाय वाघांचे भविष्य सुरक्षित राहू शकत नाही. जर त्वरित उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात वाघ फक्त चित्रांमध्येच पाहायला मिळतील!"