Saturday, January 25, 2025

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीसाठी

मुंबई, दि. : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी जनतेसाठी सामाजिक बांधिलकी दाखवणारा निर्णय घेतला. त्यांनी पहिली स्वाक्षरी पुण्यातील रुग्णाला वैद्यकीय मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.

पुण्यातील चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी या विनंतीला तत्काळ मान्यता देत फाईलवर सही केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. या कृतीने त्यांनी जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे दाखवून दिले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. या निधीतून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे कुऱ्हाडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.

शासनाच्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना आशेचा किरण मिळत असून, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(संवाददाता)

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लायकरामजी भेंडारकर, उपाध्यक्षपदी सुरेशजी हर्षे यांची निवड

गोंदिया: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व...

AIIMS नागपूर अंतर्गत 104 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!

▶️AIIMS नागपूर अंतर्गत 104 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज...

नागपूर महानगरपालिका अंतर्गत 76 पदांकरीता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!!

💎नागपूर महानगरपालिका अंतर्गत 76 पदांकरीता भरती; येथे बघा संपूर्ण...

खुशखबर,महाराष्ट्रात होणार १५.९५ लाख रोजगार निर्मिती, नोकरीच्या लाखो संधी!!*

🧑‍🎓 *खुशखबर,महाराष्ट्रात होणार १५.९५ लाख रोजगार निर्मिती, नोकरीच्या लाखो...

Related Articles