सडक अर्जुनी : बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांसाठी एक दिलासादायक आणि आवश्यक उपक्रम — किचन साहित्य वाटप शिबिर — दिनांक २३ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, आशीर्वाद लॉन, सडक अर्जुनी येथे हे शिबिर भरविण्यात येणार आहे.
या शिबिरात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या घरगुती गरजा लक्षात घेऊन अत्यावश्यक स्वयंपाक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या योजनेंतर्गत होणाऱ्या या उपक्रमासाठी कामगारांनी दिलेल्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याआधीही अशा प्रकारच्या विविध उपक्रमांद्वारे राजकुमार बडोले यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनतेपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रमसुद्धा त्याच सामाजिक जाणिवेचा एक भाग असून, हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
