कोहमारा-गोंदिया मार्ग चौपदरीकरण व दुरुस्तीबाबत विशेष बैठक
गोंदिया: कोहमारा ते गोंदिया राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व दुरुस्तीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, श्री. संजीवजी जगताप यांच्या दालनात विशेष बैठक पार पडली. बैठकीत कोहमारा-गोरेगाव रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी वनविभागाच्या अडचणी दूर करून प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, भविष्यातील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन बायपास रस्त्याचा प्रस्ताव तयार करणे, डव्वा-कोहमारा रस्ता दुरुस्त करणे आणि संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल लवकर मंजूर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसह स्थानिक जनप्रतिनिधी उपस्थित होते. आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प गतीमान करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच आवश्यक परवानग्या मिळवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.
