Monday, March 24, 2025

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान; अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणार

मुंबई | राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, ३ मार्च २०२५ पासून सुरू होणार असून, ते २६ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यात आली.

विधानभवन, मुंबई येथे झालेल्या या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी, ८ मार्च (शनिवार) रोजी सार्वजनिक सुटी असली तरी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर १३ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मंत्री गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल आदींनी सहभाग घेतला. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे व विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

“औरंगजेबाच्या कबरीभोवती वादाचा धुरळा! काय होणार पुढे?”

औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. साधी राहावी अशी औरंगजेबाची शेवटची इच्छा होती, पण त्याची कबर आज भव्य मकबऱ्यात बदलली आहे. काही जणांसाठी ती दडपशाहीची खूण आहे, तर काहींसाठी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक! कायद्यातील अडथळे, केंद्र सरकारचा अधिकार, आणि वाढत्या सामाजिक-राजकीय तणावामुळे हा विषय अधिकच गडद होत चालला आहे. कबर हटवता येईल का, आणि सरकार यावर काय निर्णय घेणार — हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!

राज ठाकरेंची ‘खोक्याभाई’ टीका; आशिष शेलार यांचे जोरदार प्रत्युत्तर

"एक खोक्याभाई काय घेऊन बसलात?" या राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे आशिष शेलार यांनी कडवट प्रत्युत्तर देत, "ज्यांना लोकसभेत जागा मिळत नाही, ते बाहेर बसून विधानं करतात," असा टोला लगावला. या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

राज्यातला एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव

एसएससी बोर्ड बंद करण्याचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असून, त्यांनी राज्य सरकारला शिक्षणविषयक धोरणावर पुन्हा विचार करण्याची मागणी केली आहे.

वाळू तस्करी : महसूलमंत्र्यांचे विभागीय चौकशी आदेश धडकले; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

वैनगंगा आणि बावनथडी नदीतून सुरू असलेल्या वाळू तस्करीचा पर्दाफाश झाला असून महसूलमंत्र्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुचाकीवर लावले जाणारे जिओ टॅग महाराष्ट्र सीमेपर्यंत आणून ट्रक व टिप्परला लावण्याची शक्कल उघड झाली असून यामुळे मोठ्या नावांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनुष्का शर्मा ने सांगितली घाटस्पोटाची कारणे

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटांचे वाढते प्रमाण यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. अनुष्काने म्हटले की, "आजच्या काळातील महिला आपल्या जोडीदारासोबत समांतरपणे वाढू इच्छितात. त्या कोणत्याही दबावाखाली जगायचं मानत नाहीत. महिला आता जास्त सहन करीत नाहीत आणि त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली आहे." तिच्या या विधानावर समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुष्काच्या मते, नात्यात पारदर्शकता आणि समानतेचा अभाव असल्यास नातेसंबंध तुटू शकतात.

नागपूरात हिंसाचार, वाहणे जाळली, रात्रीची घटना

नागपूरमधील हिंसाचार 17 मार्च 2025 रोजी महल भागात घडला, जिथे दोन गटांमधील वादामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत दोन वाहने जाळण्यात आली, पथराव झाला, आणि एका फोटोचे जाळले जाणे अहवालात नमूद केले. ही घटना संध्याकाळी 8 ते 8:30 च्या सुमारास घडली, ज्यामुळे परिस्थिती बिकट झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अश्रुधूर आणि बलाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली, तसेच 144 कलम लागू केले.

साकोलीत शिवजयंतीचा जल्लोष! शिवसेना (उबाठा) कडून महामार्गावर महाप्रसाद वितरण

"साकोलीत शिवसेना (उबाठा) तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी झाली. महामार्गावर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला."

पाटोलेंचा चा प्रस्ताव आणि राजकीय प्रतिक्रिया

"Nana Patole यांनी Ajit Pawar आणि Eknath Shinde ला MVA मध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे BJP आणि इतर नेत्यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करू शकते."

Related Articles