Saturday, January 25, 2025

Maharashtra CM : आज ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री

निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार भाजपाच्या विधीमंडळ नेत्याची निवड

मुंबई : भाजपा विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक पार पडेल. त्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांना नियुक्त केले आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याचे महानियोजन करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्री यांच्यासह जवळपास ४० हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्यदिव्य कार्यक्रमात देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.

आझाद मैदानातील शपथविधी सोहळ्यासाठीचा भव्य दिव्य मंच आणि जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैदानात एकूण ३ स्टेज उभारण्यात येणार आहेत. यातील एक स्टेज मुख्य असणार आहे. या स्टेजवर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व अन्य वरिष्ठ नेत्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या स्टेजवरसगळे संत, समाजसेवक व अन्य लोकप्रतिनिधी असतील. तिसरे स्टेज हे संगीत संयोजनासाठी आहे. या तीन स्टेजच्या समोर खासदार, आमदार यांच्यासाठी जवळपास ४०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य व्हीआयपींसाठी जवळपास एक हजार आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. महायुतीतील सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. समोरील बाजूस माध्यमांसाठी जागा आहे.

पाच डिसेंबरला शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. दरम्यान, सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे साधारणपणे २१ ते २२ खाती असतील. यात गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर विभागांसंदर्भात नंतर चर्चा होणार आहे. याशिवाय, राज्यातील नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ११ ते १२ मंत्री असतील. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये १६ खाती मागितली आहेत. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे.

उदय सामंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

महायुती सरकारचा शपथविधी आता तोंडावर आला असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शिंदेंचे शिलेदार उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांवर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच शिवसेनेचे संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राठोड आणि इतर पाच नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे. या बैठकीत उदय सामंत यांनी शिवसेनेचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांच्या समोर ठेवल्याची माहिती आहे. २३ नोव्हेंबरनंतर शिवसेना नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली ही पहिलीच बैठक आहे.

शिंदेंवर ज्युपिटरमध्ये झाले उपचार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी ते ज्युपिटर रूग्णालयात गेले होते. घसा दुखत असल्याने उपचार करून घेण्यासाठी शिंदे रुग्णालयात गेले होते. तिथे काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. शिंदे यांच्या पांढऱ्या पेशीही वाढल्या असल्याची माहिती आहे. सतत अँटिबायोटिक दिल्याने शिंदेंना अशक्तपणा जाणवत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसुद्धा ज्युपिटर रुग्णालयात सोबत होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर काही वेळातच त्यांना घरी सोडलं गेलं.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लायकरामजी भेंडारकर, उपाध्यक्षपदी सुरेशजी हर्षे यांची निवड

गोंदिया: जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व...

AIIMS नागपूर अंतर्गत 104 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!

▶️AIIMS नागपूर अंतर्गत 104 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज...

नागपूर महानगरपालिका अंतर्गत 76 पदांकरीता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!!

💎नागपूर महानगरपालिका अंतर्गत 76 पदांकरीता भरती; येथे बघा संपूर्ण...

खुशखबर,महाराष्ट्रात होणार १५.९५ लाख रोजगार निर्मिती, नोकरीच्या लाखो संधी!!*

🧑‍🎓 *खुशखबर,महाराष्ट्रात होणार १५.९५ लाख रोजगार निर्मिती, नोकरीच्या लाखो...

Related Articles