Wednesday, November 13, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली : बघा संपूर्ण यादी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आज, 23 ऑक्टोबर रोजी, 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून, अजित पवार यांनी पुन्हा बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

या यादीमध्ये राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आहेत. धनंजय मुंडे परळीतून, दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून, आणि आशुतोष काळे कोपरगावमधून निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार गटाच्या या यादीने निवडणूक चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी:

बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – अनिल भाईदास पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले – डॉ. किरण लहामटे
बसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनील शेळके
जुन्नर – अतुल बेनके
मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
हडपसर – चेतन तुपे
देवळाली – सरोज आहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कारेमोरे
पुसद – इंद्रनील नाईक
अमरावती शहर – सुलभा खोडके
नवापुर – भरत गावित
पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला

या यादीने विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाची तयारी स्पष्टपणे दिसून येते, आणि येणाऱ्या काळात ही यादी आणखी चर्चेचा विषय ठरणार आहे.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना टिकवून ठेवण्यासाठी महायुती सरकार आवश्यक: जयश्री भास्कर

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयश्री भास्कर...

फडणवीसांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा दुपट्टा

अर्जुनी/मोर - महायुतीची नवी दिशा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोर विधानसभा मतदारसंघात...

कांग्रेस नेते अजय लांजेवार आणि राजेश नंदागवळी यांची पक्षातून हकालपट्टी

गोंदिया, दि. २८: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या...

काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निघाले नामांकन भरण्यास; नागरिकांमध्ये संभ्रम कोण अधिकृत कोण अनधिकृत?

काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत झालेल्या गोंधळामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील...

राजकुमार बडोले यांचे महायुतीकडून नामांकन दाखल

दिनांक २८ ऑक्टोबर २०२३: महायुतीच्या तर्फे राजकुमार बडोले यांनी...
spot_img

Related Articles

spot_imgspot_img