गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालयात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांच्या हस्ते क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष श्री. प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष सौ. राजलक्ष्मी तुरकर, तसेच सुरेश हर्षे, पूजा अखिलेश सेठ, अश्विनी पटले, माधुरी नासरे, नेहा तुरकर, सुधा राहंगडाले, कीर्ति पटले, बिरजुला भेलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांनी महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “आज महिला सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असल्याने अधिकाधिक महिलांनी राजकारणात सक्रिय भाग घ्यावा.”
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला संघटनेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांच्या प्रगतीसाठी सरकारच्या लाडली बहिण योजना आणि विविध रोजगारसंधी उपलब्ध करून देणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी पक्षाच्या पुढील योजना सादर करण्यात आल्या. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील असंख्य महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
