मुंबई – (22 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज आमदार राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार बडोले यांनी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रलंबित प्रकल्पांविषयी माहिती दिली आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. विशेषतः कृषी, सिंचन, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासंबंधीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याची मागणी त्यांनी केली.
पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, स्थानिक पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीमुळे अर्जुनी मोर मतदारसंघातील विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.