अर्जुनी मोरगावच्या तावसी येथील साई श्रध्दा लॉनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या विजयासाठी निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला.
बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, ज्यात सिंचन, शेती, रोजगार, पर्यटन विकास, तसेच महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजनांच्या अविरत चालू ठेवण्यावर भर देण्यात आला. कोणत्याही भेदभावाशिवाय एकजुटीने काम करून श्री बडोले यांना विधानसभेत बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांनी आपले प्रयत्न एकत्रित करण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यासह राजकुमार बडोले, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, यशवंत गणवीर, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, नारायण भेंडारकर, दाणेश साखरे, उद्धव मेहंदळे, योगेश नाकाडे, मंजूषा बारसागडे, सुशीला हलमारे, सुशीला राऊत, घनश्याम मेहता, राकेश जायस्वाल, किशोर ब्राह्मणकर, आम्रपाली डोंगरवार, हर्षा राऊत, लता दृगकर, निशाताई मस्के, नागपुरे ताई, रतिराम राणे, सागर आरेकर, माधुरी पिंपळकर, चित्रलेखा मिश्रा, माधुरी बनपूरकर, अनिशा पठाण तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- प्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वच्छता अभियान व कार्यकर्ता मेळावा संपन्नप्रतापगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवराज्य सप्ताहानिमित्त स्वच्छता अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान; अर्थसंकल्प १० मार्चला सादर होणारराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्चदरम्यान होणार असून, १० मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्चला कामकाज सुरू ठेवण्याचा व १३ मार्चला होळी निमित्ताने सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धा; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसादअर्जुनी मोरगाव येथे लोकमत सखी मंचतर्फे भव्य साडी वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्या शारदाताई बडोले यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला.
- सडक अर्जुनीत स्वच्छता अभियानाने दिला स्वच्छतेचा संदेशछत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सडक अर्जुनी शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
- निर्दय हत्या प्रकरणी गोरेगावात धडक निषेध मोर्चा; कठोर कारवाईची मागणीगोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील देवुटोला शेतशिवारात १७ वर्षीय कु. पूर्णिमा नागवंशी हिची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला जाळण्यात आले. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी गोरेगावात सामाजिक संघटनांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.