कोदामेडी/केसलवाडा (ता. सडक अर्जुनी) | भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज गावातील अंगणवाडी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच निशांत राऊत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत आणि संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित केले.
शाळकरी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम व्यक्त केले, तर शिक्षकांनी भारतीय संविधान आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागावर भाष्य करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.