अर्जुनी/मोर – महाराष्ट्रातील संभाजीनगर येथून आलेल्या पूज्य भन्ते यांच्यासोबत आमदार राजकुमार बडोले यांनी आपल्या परिवारासह तिबेट कॅम्प येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक बौद्ध विहारात जाऊन भगवान बुद्धांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
या प्रसंगी पूज्य भन्ते यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली आणि सामाजिक समरसता, शांती व मानवतेच्या तत्त्वांचे महत्त्व पटवून दिले. आमदार बडोले यांनी या भेटीत बौद्ध समाजाच्या विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या.
तिबेट कॅम्पमधील नागरिकांनी या भेटीचे स्वागत केले आणि आमदार बडोले यांनी दाखविलेल्या आत्मीयतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या भेटीमुळे बौद्ध समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
