गोंदिया: क्रिसमस सणाच्या निमित्ताने सावरी येथील भाऊसाहेब बोरा मतिमंद निवासी विद्यालयात योगेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर आणि भारत विकास परिषदेच्या गोंदिया शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी ऊबदार जॅकेट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाची अध्यक्षता कालूराम अग्रवाल यांनी केली. शरद क्षत्रिय यांनी प्रस्तावना मांडली. या कार्यक्रमात सुनीता क्षत्रिय, दिलीप चौरागडे, प्रशांत शहारे (सचिव, योगेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था), प्रशांत भांडारकर, डॉ. सुषमा यदुवंशी, जुनेजा मॅडम, जोशी सर, जोशी मॅडम, मनीष गुप्ता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना नाश्ता आणि चॉकलेट्स वाटप करून ख्रिसमस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका वैशाली वैद्य यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन केले, तर संस्थेचे कोषाध्यक्ष भारत शहारे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे कर्मचारी सम्यक कोचे, कुणाल बडोल, चंद्रशेखर रामटेके, अरविंद मेश्राम, महेश ठवरे, शिल्पा शहारे, काजल रंगारी, सरिता मेश्राम, सुनीता रामटेके, विशाल बन्सोड, संतोष गावडे, अविनाश गजभिये यांनी विशेष प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद:
या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. थंडीपासून संरक्षण मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. क्रिसमसचा हा आगळावेगळा अनुभव मुलांसाठी संस्मरणीय ठरला.