गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्याताई लांजे यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार राजकुमार बडोले होते. त्यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बीजेपी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, उपसभापती सौ. निशा कशीवार, पंचायत समिती सदस्य डॉ. भूमेश्वर पटले, माजी पंचायत समिती सभापती गिरधारी हत्तीमारे, माजी उपसभापती शैलेंद्र कापगते, पंचायत समिती सदस्य वर्षा शहारे यांची उपस्थिती होती.
संस्थेचे सचिव अशोक लांजे, तसेच हितेश डोंगरे, लोकचंद कापगते, नरेंद्र बडोले, दिलीप शहारे, चरण शहारे, डॉ. अश्विनी लांजे यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक वाय. पी. बनसोड, के. के. पुस्तडे, प्राचार्य आर. वाय. कापगते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, गीत व नृत्य सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाला गावकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सामाजिक योगदानाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.