गौरनगर: पूजा कमेटी गोरनगरच्या वतीने श्री श्री महानाम संकीर्तन महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले. या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भक्तीमय वातावरण अनुभवले. धार्मिक मंत्रोच्चार, कीर्तन आणि संकीर्तनाच्या माध्यमातून भाविकांनी प्रभू चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
कार्यक्रमाला माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच, महाप्रसाद वितरणात सहभागी होत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य देशमुख, महिला व बालकल्याण सभापती ढेंगे, तसेच इतर मान्यवर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



