अमेरिकेच्या नव्या कर धोरणामुळे २ एप्रिलपासून भारतीय बाजारपेठ मोठ्या संकटात सापडू शकते. या धोरणामुळे अब्जावधी डॉलरचा व्यवहार धोक्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या सरकारने नव्या व्यापार धोरणांतर्गत परस्पर शुल्क (reciprocal tax) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा मोठा फटका भारतासह इतर विकसनशील देशांना बसू शकतो.
भारताच्या व्यापार क्षेत्राला धक्का?
या नव्या धोरणामुळे भारतीय कंपन्यांची निर्यात महाग होऊ शकते, ज्याचा परिणाम थेट भारतीय शेअर बाजारावर आणि गुंतवणूकदारांवर होईल. अमेरिकेत निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त कर लागू झाल्यास भारतीय कंपन्यांना स्पर्धात्मक दर देणे कठीण होईल.
शेअर बाजारावरही परिणाम?
विश्लेषकांच्या मते, या धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात अस्थिरता येऊ शकते. विशेषतः आयटी, फार्मा आणि टेक्सटाइल क्षेत्रातील कंपन्यांवर मोठा परिणाम होईल, कारण या कंपन्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत व्यापार करतात.
काय म्हणतात तज्ज्ञ?
अर्थतज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार युद्धाची ही सुरुवात असू शकते. भारताने आपल्या व्यापार धोरणात आवश्यक बदल न केल्यास निर्यातदार आणि गुंतवणूकदारांसाठी हे मोठे संकट ठरू शकते.
