स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर (भंडारा) येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दि. 8 मार्च 2025 रोजी रेल्वे मैदानावर वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. धावणे, गोळा फेक, थाळी फेक आणि भाला फेक यासारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विजेत्यांना दि. 11 मार्च रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
कोहमारा येथे बिरसा मुंडा व राणी दुर्गावती स्मारक समितीच्या वतीने आयोजित "गोंड राजाल-गोंड रानी फॅशन शो २०२५" राज्यस्तरीय कला आणि वेषभूषा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. आदिवासी युवक-युवतींना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या पारंपरिक तसेच आधुनिक कलांचे प्रदर्शन व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घुसोबाटोला येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या जिद्द, संघर्ष आणि योगदानाला सलाम करत त्यांना प्रेरणादायी संदेश दिले.
गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या प्रगतीसाठी पक्षाचे योगदान व सरकारी योजनांबाबत विचार मांडण्यात आले.
वडेगाव येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला आणि लिंग समानता, हक्क आणि संधी यासंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रमुख अतिथी व प्राध्यापकांनी महिलांच्या योगदानाची महती सांगत, समाजात महिलांना समान संधी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
"मला चटके देताना ते एवढंच म्हणायचे की, 'तुला आता कळेल मंदिरात शिरायची हिंमत कशी होते,' असे सांगताना कैलास बोराडेचे डोळे पाणावले. तप्त लोखंडी सळईने त्याच्या अंगावर चटके दिले गेले, आणि त्याला अमानुष मारहाण सहन करावी लागली. या धक्कादायक घटनेनंतरही त्याला उपचारांसाठी धडपडावे लागले, पण आता सरकार आणि समाजाने त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले