गट ग्रामपंचायत महालगाव येथे भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात व सन्मानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मिनाताई डेमराज शहारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगी “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कुणी त्याला प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही!” या प्रेरणादायी विचारावर मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या विचारांनी गावात नवचैतन्य निर्माण झालं.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर गहाणे (उपसरपंच), अरुणजी हातझाडे (ग्रामपंचायत अधिकारी), भाऊराव खोब्रागडे (माजी जिल्हा परिषद सदस्य), ओमप्रकाश नाईक, रसिकाताई मारगाये, विशाखा शहारे, गजानन रामटेके (मुख्याध्यापक), हुकरे सर (सहाय्यक शिक्षक), विशाखा रामटेके, रागिणी रामटेके, कडाम मॅडम, भीमरावजी रामटेके, रमेशभाऊ रामटेके, रणजित नागोसे, कार्तिक राणे यांच्यासह गावातील अनेक जेष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभली.
