आभाळ फाटले, वादळ दाटले,
बुलडोझर आले, घरच उध्वस्त झाले.
आग धगधगली, धूर भरून गेला,
स्वप्नांचा गाव क्षणात जळून गेला.
अनन्या धावत गेली निर्धाराने,
आठवले तिला दप्तर उराशी.
भीती नव्हती तिच्या मनामध्ये,
शिक्षणाचा दीप उजळत होती.
आंबेडकर नगरचा अभिमान ती,
ज्ञानाच्या वाटेवर ती चालली.
वाघिणीच्या दुधासम शिक्षण हवे,
परिवर्तनाचे विचार पेरायचे.
आमच्या आसवांचे मोल कुठे?
रक्ताच्या ओढीने आश्रय शोधायचे.
आमच्या वाटा आगींनी भरल्या,
संसार उद्ध्वस्त, स्वप्ने विरल्या.
पण अनन्या जिंकणार आहे,
शिक्षणाच्या प्रकाशात वाढणार आहे!
-राकेश भास्कर