शिरूर कासार (बीड) : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या घरावर वन विभागाने बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली आहे. शिरूर कासार गावात वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हे घर पाडण्यात आले. याआधी वन विभागाने भोसलेला नोटीस पाठवली होती, मात्र ४८ तासांमध्ये उत्तर न दिल्याने कारवाई करण्यात आली.
दरम्यान, बीड पोलिसांनी प्रयागराजमधून खोक्या भोसलेला ताब्यात घेतले असून त्याला बीड येथे आणले जात आहे. त्याचवेळी वन विभागाने त्याच्या घरावर धाड टाकली आणि घरातील धारदार शस्त्रे, प्राण्यांचे मांस, जाळी आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त केले.
