Friday, May 2, 2025

गावाकडच्या वार्ता

गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळावा: उत्साह आणि भक्तीचा अनुपम संगम!

अर्जुनी-मोरगाव येथे २९ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झालेल्या गोंदिया जिल्हास्तरीय महिला मेळाव्याने भक्ती आणि उत्साहाचा अनुपम संगम अनुभवला. जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. वृंदाताई जोशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हजारो महिलांनी पारंपारिक वेशभूषेत मडावी सेलिब्रेशन हॉलमध्ये हजेरी लावली. स्वागत गीत, पूजन आणि महाप्रसादाने हा मेळावा अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा अनोखा उत्साह

डा येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवसाचा उत्साह अभूतपूर्व होता. ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन देशभक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश दिला.
spot_imgspot_img

निधन वार्ता

साकोलीतील सिव्हिल वार्ड येथील सत्यभामा बनकर यांचे निधन, बुधवार ३० एप्रिल रोजी अंत्ययात्रा कुंभली येथे.

राजकुमार बडोले यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली पाठपुरावा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

सडक अर्जुनीत खरीप हंगामासाठी नियोजन बैठक

सडक अर्जुनी येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठे नुकसान; आमदार बडोले यांचा दौरा

आमदार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले

कोहळीटोला गावातील एक दीप अचानक मालवला!”

"झाडीपट्टीतील एक तेजस्वी स्वर हरपला! कोहळीटोला येथील माजी सरपंच व उत्कृष्ट गायक जिवनलालजी लंजे यांच्या निधनाने संपूर्ण परिसर शोकमग्न."

दहा विद्यार्थ्यांना परदेशी पाठवण्याचा राजकुमार बडोले फाउंडेशनचा संकल्प

विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशनने भव्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले. दहा विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचा निर्धार व्यक्त करत फाउंडेशनने नव्या स्वप्नांना पंख दिले.