Tuesday, May 13, 2025

शांततेच्या मार्गानं गोठणगावची रॅली – महाबोधी मुक्तीची जोरदार मागणी
“बच्चा बच्चा भीम का महाबोधी के काम का” या घोषणेने दुमदुमला गोठनगाव

वार्ता प्रतिनिधी, गोठणगाव (ता. अर्जुनी मोर)

पंचशील बौद्ध समाज मंडळ, गोठणगाव यांच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज एक भव्य व शांततामूलक रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाबोधी विहार हे जागतिक वारसा स्थळ असूनही, स्थानिक बौद्ध अनुयायांना त्या ठिकाणी धार्मिक स्वातंत्र्य व व्यवस्थापनाचे हक्क दिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन उभे राहिले आहे.

या रॅलीत महिलांसह युवक व वयोवृद्ध नागरिकांनीही पांढऱ्या शुभ्र वस्त्रात सहभागी होऊन शांततेच्या मार्गाने आपला आवाज बुलंद केला. “बुद्ध विहार आमचा, व्यवस्थापन आमचं”, “शांतता हीच आमची शक्ती”, “महाबोधी मुक्त करा” अशा घोषणा देत त्यांनी गावातून मिरवणूक काढली. रॅलीपूर्वी विहारात पंचशील वंदना घेण्यात आली.

या रॅलीत सहभागी झालेले प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ:
मिथुन टेंभुर्णे, हनुजी लाडे, आशिष लाडे, दीनदयाल रामटेके, शिवशंकर टेंभुर्णे, कांतिलाल डोंगरवार, विलास कऱ्हाडे, शैलेश टेंभुर्णे, गोपाल राऊत, डिपेश्वर टेंभुर्णे, कामेश जनबंधू, प्रमोद राऊत, छगन डोंगरवार, किशोर टेंभुर्णे, प्रशिक चौधरी, प्रजय कऱ्हाडे, सचिन डोंगरवार, आकाश राऊत, रोहित नंदेश्वर, सुमित डोंगरवार, खेमराज रामटेके, राजेशजी टेंभुर्णे, नेपाल डोंगरवार, रंजित कऱ्हाडे, शुभम टेंभुर्णे, अभय लाडे, पुरुषोत्तम साखरे, नरेश टेंभुर्णे, मिलिंद जांभूळकर, प्रशांत शहारे, दीपक डोंगरवार, गणेश डोंगरवार, नेमिचंद डोंगरवार, लालदास डोंगरवार, मुनेश्वर साखरे, सोहम डोंगरवार, पुरुषोत्तम डोंगरवार, ज्ञानेश्वर डोंगरवार, जयपाल डोंगरवार, द्रोण जनबंधू, कार्तिकजी वालदे.

समाजमनावर परिणाम:
या रॅलीमुळे गावात सामाजिक जागृती, बौद्ध अस्मिता आणि शांततामूलक आंदोलनाची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. बौद्ध समाजाच्या हक्कासाठीच्या या निर्धाराने आगामी काळात या लढ्याला अधिक बळकटी मिळणार असल्याचे संकेत या रॅलीने दिले.

तावशी खुर्दमध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन; सरपंच मिनाताई शहारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

वार्ता प्रतिनिधी, तावशी खुर्द (ता. अर्जुनी मोर)

आज दिनांक १२ मे २०२५ रोजी तावशी खुर्द येथील प्रज्ञा बौद्ध विहार आणि नागसेन बौद्ध विहार या ठिकाणी महाकारूणिक तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. मिनाताई डेमराज शहारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर दोन्ही विहारांमध्ये सामूहिक त्रिशरण, पंचशील, मंगल आणि अष्टगाथा वंदना सादर करण्यात आली. यावेळी उपस्थित उपासक-उपासिकांनी गौतम बुद्धांचा जन्म दिवस, ज्ञान प्राप्ती दिवस आणि महापरिनिर्वाण दिन यांचे औचित्य साधून त्यांच्या कार्यावर श्रद्धेने प्रकाश टाकला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना सरपंच मिनाताई शहारे म्हणाल्या, “बुद्धगया मुक्ती आंदोलन हे आपल्या श्रद्धेच्या आणि हक्काच्या लढ्याचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा प्रकाश पेरला. आज महाबोधी बुद्ध विहार बौद्ध अनुयायांच्या सन्मानाची आणि आत्मसन्मानाची गोष्ट आहे. प्रत्येक बुद्धिष्ठाने या पवित्र लढ्यात सामील व्हावे.”

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ:
माजी पो. पाटील सोमा शहारे, लोपंचंद जांभूळकर, जयद्र जांभूळकर, समिल राऊत, कंचन शहारे, साहील लाडे, कुणाल ढवळे, आकाश शहारे, विक्रम शहारे, जितेंद्र शहारे, सौरभ शहारे, कविताई शहारे, नम्रता टेंभुर्णे, निशा जांभूळकर, सपना लाडे, अल्का भैसारे, यशोधरा ढवळे, उर्मिला जांभूळकर तसेच गावातील दोन्ही बौद्ध विहारांतील सर्व उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केशोरी येथे पंचशील बौद्ध समाजाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी – शांती, समता व जागृतीचा संदेश

वार्ता प्रतिनिधी, केशोरी (ता. अर्जुनी मोर)

आज दिनांक १२ मे २०२५ रोजी पंचशील बौद्ध समाज, केशोरी यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त महाकारूणिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक त्रिशरण, पंचशील, मंगल आणि अष्टगाथा वंदना यांनी झाली. या दिवशी तथागत बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण दिन एकत्रितपणे साजरा करत शांततेचा आणि समतेचा संदेश देण्यात आला.

बोपाबोंडी गावात बौद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी – ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

वार्ता प्रतिनिधी, बोपाबोंडी डी (ता. अर्जुनी मोर)

आज दि. १२ मे २०२५ रोजी बोपाबोंडी डी गावातील बौद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील वंदना घेण्यात आली.

या कार्यक्रमात ग्रामपंचायत सरपंच निलिजी मेल, पंच गणेशजी कापगते, शास्त्री रामटेक, माजी चि. प्रशांती मेधाम, से. लोकर चीना आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच उपसरपंच सुनी मेमाम, मुन्नीबाई मेहनास रामटेक, सोनम रामूळे, योगेश्वरी सेलोकर, विरेंद्र बन्सोड, पतीमा कान्छेकर, वर्षा बन्सोड, शितल नदानकी यांचाही कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता.

कार्यक्रमात रमाबाई रामले, चंद्रलेखा रामक, सुरेखा वेदय, कोकिला बन्सोड, निलिमा माय, पुष्पा माम, तृप्ता नदागवळी, रामीनी बन्सोड, वच्छालाबाई राम यांच्यासह गावातील अनेक महिला व उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन शांततामूलक वातावरणात पार पडले असून उपस्थित सर्वांनी तथागत बुद्धाच्या विचारांची आठवण करत “धम्मपथाने चालण्याचा” संकल्प केला.

खोबा येथील आनंद बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी – शांतीचा संदेश गगनात घुमला

वार्ता प्रतिनिधी, खोबा (ता. अर्जुनी मोर)

खोबा येथील आनंद बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चंद्रकुमार बोरकर, उपाध्यक्ष श्री. राजकुमार राऊत होते.
श्री. शामराव टेभेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक त्रिशरण पंचशील वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमात श्री. मदन देशपांडे, संदीप बोरकर, जितेंद्र इलमकर, शिलाबाई उके, रंजना वासनिक, केरवंता बोरकर यांच्यासह अनेक उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत धम्ममार्गावर चालण्याचा संदेश देण्यात आला.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

“महायुतीचा फॉर्म्युला ठरला: माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार गटात सामील”

अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे....

भंडाऱ्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विशेष मानवंदना

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्यातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे पारंपरिक पद्धतीने मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला. त्रिसरण, पंचशील, धम्मदेशना आणि सामूहिक धम्मपाठाच्या माध्यमातून तथागत बुद्धांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे याच वॉर्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित, आधुनिक वाचनालयाच्या उभारणीला सुरुवात झाली असून ₹४५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. फर्निचर, संगणक आदी सुविधा पुरवून ज्ञानाचा खजिना उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लायब्ररींना पुस्तकांचे ५ सेट देण्याचं आश्वासन देत, पुढील टप्प्यात आणखी अभ्यासिका सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

मैत्रेय बौद्ध विहार नाशिक नगर, भंडारा येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा

धम्मदेशना, भोजनदान आणि खीरदानाने उजळला बुद्ध पौर्णिमेचा पवित्र सोहळा – नाशिक नगरातील मैत्रेय बौद्ध विहारात साजरा झाला एक आगळा अध्यात्मिक अनुभव.

त्रिविध बुद्ध पौर्णिमा निमित्त सिंदपुरी (पौनि) येथील बुद्ध विहारात धम्म, करुणा आणि सेवा यांचा संगम

"धम्मदेशना, पूजापाठ आणि रक्तदानाच्या माध्यमातून त्रिविध बुद्ध पौर्णिमा झाली साजरी; मान्यवरांच्या उपस्थितीत बौद्ध संस्कृतीचा सन्मान"

बुध्द जयंती ठरली निर्धार दिन; महाविहार मुक्तीसाठी लोकलढ्याचा निर्धार – आ. बडोले

"महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा केवळ आंदोलन नाही, तर तो धार्मिक स्वातंत्र्याचा दीपस्तंभ ठरेल," असे प्रतिपादन आ. राजकुमार बडोले यांनी बुध्द जयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये केले. पंचशील ध्वजाखाली एकत्र येत शेकडो कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी संघटनांनी या लढ्याचा निर्धार करत सरकारला ठाम संदेश दिला आहे.

“महाबोधी विहार मुक्तीसाठी बुद्ध पौर्णिमेपासूनच धम्मगर्जना!”

राजकुमार बडोले यांचे आवाहन – बुद्ध पौर्णिमेपासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जनजागृती, ठराव, रॅली आणि घोषणांनी धम्मगर्जना करा!

महाबोधी महाविहार मुक्ती लढा ‘पंचशील ध्वजा’ खाली लढू – राजकुमार बडोले

: तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव मुक्तीसाठी आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नाही, तर हा धम्माचा, मानवतेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.

राजकुमार बडोले फाउंडेशनचा बोधगया आंदोलनास जोरदार पाठिंबा; “आपसी संघर्ष थांबवा, नाहीतर इतिहास माफ करणार नाही!”

बोधगया येथील महाबोधी मुक्ती आंदोलनास राजकुमार बडोले फाउंडेशनचा ठाम पाठिंबा; बडोले म्हणाले, "आपसी भांडणातून आंदोलन दुर्बल होते, एकत्र या आणि संघर्ष सशक्त करा."

बोधगया महाबोधी मंदिर प्रकरणावर राज्यातून आवाज — राजकुमार बडोले फाउंडेशनचा आंदोलनाला पाठिंबा

राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बौद्ध उपासक-उपासिकांचा जत्था बोधगया येथे 5 मे रोजी रवाना झालेला आहे. महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी चाललेल्या ऐतिहासिक आंदोलनाला फाउंडेशनचा थेट पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

Related Articles