कोहळीटोला गाव व झाडीपट्टी परिसरावर शोककळा पसरली आहे. कोहळीटोला येथील माजी सरपंच, झाडीपट्टीतील लोकप्रिय गायक आदरणीय जिवनलालजी लंजे यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरावर दुःखाचे वातावरण पसरले आहे.
जिवनलालजी लंजे यांनी सार्वजनिक जीवनात आपली विशिष्ट छाप उमटवली होती. सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटले. तसेच झाडीपट्टीच्या लोकसंगीतातही त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या आवाजातील गोडवा व गाण्यांमधील आत्मीयता अनेकांच्या मनाला भिडली होती.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अनेक सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्याचा व आवाजाचा आदरपूर्वक स्मरण करत “वार्ता” परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
