भारतीय रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. एकूण 9,900 पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून, इच्छुक उमेदवारांना 10 एप्रिल 2025 ते 9 मे 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
भरतीविषयी महत्त्वाची माहिती:
पदाचे नाव: सहाय्यक लोको पायलट (ALP)
एकूण जागा: 9,900
वेतन: ₹19,900 (7 व्या वेतन आयोगानुसार)
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे (1 जुलै 2025 पर्यंत)
वैद्यकीय पात्रता: A-1 श्रेणी
अर्ज प्रक्रिया: फक्त ऑनलाईन
आधार पडताळणी आवश्यक!
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आधार क्रमांक पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. आधार कार्डावरील नाव आणि जन्मतारीख दहावीच्या प्रमाणपत्राशी 100% जुळली पाहिजे. तसेच, उमेदवारांनी आपले नवीन फोटो, बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि आयरिस) अपडेट करून घेणे गरजेचे आहे.
अधिकृत अधिसूचना कुठे पाहता येईल?
जाहिरातीसाठी इथे क्लिक करा
ही माहिती फक्त सूचक स्वरूपाची आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत CEN No. 01/2025 (ALP) अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. 9 एप्रिल 2025 पासून अधिकृत रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) च्या वेबसाइट्सवर संपूर्ण अधिसूचना उपलब्ध होईल.
सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे!