साकोली शहरातील सिव्हिल वार्ड येथील रहिवासी श्रीमती सत्यभामा नामदेवराव बनकर (वय ७८) यांचे मंगळवारी २९ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांचा अंत्यविधी बुधवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता त्यांच्या राहत्या घरून, सिव्हिल वार्ड येथून सुरू होणार आहे. अंत्ययात्रा श्रीक्षेत्र कुंभली येथील चुलबंद नदीघाटावर नेण्यात येणार आहे.
सुनिल एन. बनकर, वॉटर प्लॉट जवळ, प्रगती कॉलनी, गडकुंभली रोड, साकोली/सेंदूरवाफा येथून अंत्ययात्रेला प्रारंभ होणार आहे.
श्रीमती बनकर यांच्या पश्चात ४ मुले, १ मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
