सौंदड (ता. सडक अर्जुनी) | प्रतिनिधी
सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे ई-लोकार्पण राज्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमात आमदार राजकुमार बडोले यांनी नव्या इमारतीमुळे परिसरातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुरुगानंथम एम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे, पंचायत समिती सभापती चेतनजी वळगाये यांच्यासह पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे, शिवाजी गहाणे, शामरावजी शिवणकर, मंजुताई डोंगरवार, विष्णुजी अग्रवाल, गौरेशजी बावनकर, सुभाषजी कापगते, चरणदासजी शहारे, पोलीस पाटील सिमाताई निंबेकर, रंजनाताई भोई, भाऊरावजी यावलकर, खुशाल ब्राम्हणकर, दिलीपजी शहारे, डॉ. प्रशांतजी तुरकर, डॉ. दिपक आगलावे, डॉ. आशीष निर्वाण यांसह अनेक पदाधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.