Wednesday, February 5, 2025

शेतकऱ्यांच्या बांधावर प्रचार दौरा: महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी जांभळी आणि अर्जुनी/मोर. मध्ये केले मतदारांना आव्हान

दिनांक १० नोव्हेंबर २०२४: अर्जुनी/मोर. विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन मतदारांना आव्हान केले. या दौऱ्यात राजकुमार बडोले यांनी जांभळी व अर्जुणी मोर या गावांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना आगामी निवडणुकीत महायुतीला प्रथम क्रमांकाची बटन दाबून घडयाळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

राजकुमार बडोले यांनी आपल्या भाषणात, “आपल्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना योग्य व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महायुतीचा विजयी होणे आवश्यक आहे. घडयाळ चिन्हावर आपले मत दिल्याने आपल्याला विकासाच्या दिशा मिळतील,” असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, “महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध आहे. याचाच भाग म्हणून, आम्ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करणार आहोत. लोकांना त्यांच्या हक्कांची ग्वाही दिली जाईल.”

या प्रचार दौऱ्यादरम्यान, राजकुमार बडोले यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रीत केले. ते म्हणाले की, “आपल्या शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळवून देण्यासाठी, विविध कृषी योजनेत सुधारणा करण्यावर आम्ही ठाम आहे.”

राजकुमार बडोले यांचा प्रचार दौरा शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांसह अनेक महायुतीचे समर्थक उपस्थित होते.

Hot this week

साकोलीच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष

साकोलीच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू असलेल्या रस्सीखेचामुळे...

महिलांसाठी नवी संधी: चार तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन आणि एकवेळचे जेवण; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये...

भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठांच्या फोटोचा वापर: अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचाराची नवी खेळी

साकोली: अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजप व मित्र पक्षांच्या वरिष्ठ...

पक्ष जरी बदलला तरी मी महायुतीतच आहे – राजकुमार बडोले

माजी सामाजिक न्याय मंत्री आणि भाजप नेते राजकुमार बडोले...

शेतकऱ्यांची मागणी: शेतातील वीज पुरवठा २४ तास सुरू करावा

अर्जुनी/मोर: तालुक्यातील वांगी, चिंगी, बोळदे, कोकणा/गो, कोकणा/ज, खोबा/ह, खोबा/गो,...

साकोलीत श्री संत लहरीबाबा पुण्यतिथी उत्सव थाटात संपन्न

साकोली व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री संत...

शोकवार्ता

भाजप तालुका महामंत्री लैलेश्वर शिवणकर यांना मातृशोकअर्जुनी-मोर: भारतीय जनता...

Related Articles