Saturday, April 19, 2025

Tag: #JaybhimPadyatra #AmbedkarJayanti #RajkumarBadole #Wartaa

जयभीम पदयात्रेचा उत्साह मुंबईत! राजकुमार बडोले यांचा सहभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त आज मुंबईत केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नरिमन पॉईंट ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत भव्य जयभीम पदयात्रा आयोजित करण्यात आली. या पदयात्रेत हजारो अनुयायींनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे, माजी सामाजिक न्याय मंत्री आणि अर्जुनी मोर विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले यांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती दर्शवत उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक समतेचा संदेश दिला.