Saturday, April 19, 2025

Tag: #JyotibaPhuleJayanti #EducationForAll #SocialReform #Wartaa

ज्ञानदा महिला महाविद्यालयात महात्मा फुले जयंतीचा उत्सव; प्राचार्य देवपुरी यांचे प्रभावी विचार!

तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. प्राचार्य छोटू देवपुरी यांनी सत्यशोधक समाजाच्या योगदानावर भाष्य केले, तर प्रमुख अतिथी प्राध्यापिका छाया राऊत यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा. विजय रंगारी यांनी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या महत्त्वावर भाष्य करताना त्यांचे सामाजिक परिवर्तनातील योगदान अधोरेखित केले.