सौंदड (ता. अर्जुनी मोर) : संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री. संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ सौंदड यांच्या वतीने भव्य जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार राजकुमार बडोले यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या प्रेरणादायी संबोधनातून संत तुकाराम महाराज यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून समाजाला समतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आजही समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपण समाजकारण आणि लोककल्याणासाठी कार्य केले पाहिजे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. लायकराजमी भेंडारकर (जिल्हा परिषद अध्यक्ष) होते. प्रमुख अतिथी म्हणून वर्षाताई शहारे (पंचायत समिती सदस्या), श्री. हर्षजी मोदी (सरपंच सौंदड), श्री. रमेशजी चुऱ्हे (माजी जिल्हा परिषद सदस्य), श्री. अशोकजी लंजे (माजी जिल्हा परिषद सभापती), रूपालीताई टेंभुर्णी (माजी जिल्हा परिषद सदस्य), रंजनाताई भोई (ग्रामपंचायत सदस्य), श्री. शुभमजी जनबंधू (ग्रामपंचायत सदस्य), श्री. शामरावजी शिवनकर, श्री. संदीपजी मोदी, श्री. बबलूजी मारवाडे (पत्रकार), श्री. विनयजी भेंडारकर, योगेश्वरीताई निर्वान, प्रमिलाताई निर्वाण, श्री. खुशालजी ब्राह्मणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर भजन, प्रवचन व कीर्तन यांसारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला रंगत आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीचे महत्त्व तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा जागर केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ सौंदड च्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होत भक्तीमय वातावरण अनुभवले.
