Homeताज्या बातम्याकला सादर करण्यासाठी रंगमंच हे मोठे साधन -किरण कांबळे

कला सादर करण्यासाठी रंगमंच हे मोठे साधन -किरण कांबळे

गणेश मंडळातर्फे किरणताई कांबळे यांचे जंगी स्वागत

केसलवाडा:- येथील गणेश मंडळांतर्फे सांस्कृतिक कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किरणताई कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य, मा.विनोद पुसाम सरपंच, झाडे ताई ग्रा. सदस्य , फुंडे , भांडारकर , खोटेले ,झाडे व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली.गणेश मंडळातर्फे उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी बोलतांना किरणताई म्हणाल्या की,आपल्या संस्कृतीमध्ये श्रद्धेला खूप मोठं स्थान आहे. झाडीपट्टीतील रंगमंच कलाकारांनी टिकवून ठेवला आहे. कलाकारांना कला सादर करण्यासाठी रंगमंच हे मोठे साधन आहे. आपली कला सादर करताना आपली कला लोकांपुढे कशा प्रकारे व किती चांगला प्रकारे कसे प्रदर्शित करता येईल यातच कलाकार धन्यता मानत असतात. कलाकार हा कधी मोबदल्याचा विचार करीत नाही.तसेच गणेश मंडळातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.तसेच किरणताई यांनी मंडळाला भेट दिल्या बद्दल मंडळातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा आनंद द्विगुणित झाला. होणाऱ्या विधानसभा निवडणुकी साठी शुभेच्छा देत आम्ही सगळे किरणताई सोबत आहोत अशा भावना व्यक्त केल्या.
ह्या वेळी मंडळातील सर्व सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामवाशी उपस्थित होते.

Previous article
RELATED ARTICLES

Most Popular