ढासगड: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री संत अमररत्न तवाडे बाबा दीपस्तंभ सेवा भावी संस्था, ढासगड यांच्या वतीने भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत अखंड ज्योत जागृती आणि भव्य गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले. या पवित्र सोहळ्यात सहभागी होत माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी सद्गुरुमाऊली अमररत्न तवाडे बाबांचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, पंचायत समितीचे सभापती चेतनजी वळगाये, रमेशजी मेंढे यांसह अनेक भक्तगण उपस्थित होते. या यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
