तिरोडा: भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ प्रो. चंद्रशेखर व्यंकट रमण (सी. व्ही. रमण) यांच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील ज्ञानदा महिला महाविद्यालयात या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. छोटू देवपुरी पुरी यांच्या हस्ते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विज्ञानाच्या योगदानाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रामन इफेक्ट’ (Raman Effect) या शोधाचा शोधनिबंध जगासमोर सादर करण्यात आला. १९३० मध्ये या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
या वेळी भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. विजय रंगारी यांनी विज्ञान दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भारतातील तरुणांनी विज्ञान हे केवळ अभ्यासाचे क्षेत्र म्हणूनच नव्हे, तर करिअर म्हणूनही निवडले पाहिजे. विज्ञानाच्या सहाय्याने देशाच्या प्रगतीला चालना मिळते आणि भावी पिढ्यांचे भविष्य घडते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एच. गौरखेडे मॅडम यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अविनाश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ए. एस. वासनिक, डॉ. आर. डी. काटेखाये, निरंजन जनबंधू, दिगंबर राऊत, चंद्रशेखर उपरीकर, रत्नदीप बडोले, सुमेध शहारे, छाया राऊत, प्रियंका गजभिये आणि ममता बडगे यांनी सहकार्य केले.
