आज सोमवार, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती भारतीय जनता पक्ष तालुका सडक/अर्जुनीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष मा. लक्ष्मीकांतजी धानगाये, महामंत्री गिरधारीजी हत्तीमारे, तुकाभाऊ राणे, शक्तीप्रमुख संदीप धानगुणे, सुभाष कोडवते, तुलारामजी येरने, लोपचंदजी कापगते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रम मा. आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले साहेब यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आगामी राजकीय हालचालींविषयी आंतरिक चर्चा केल्याचेही सूत्रांकडून समजते. त्यामुळे या कार्यक्रमाला केवळ जयंतीपूजनापुरता मर्यादित न ठेवता, भविष्यातील राजकीय समीकरणांची चाहूल लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
