अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.
आमदार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले
देशातील नक्षलवाद्यांविरोधातील इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या 7,000 पेक्षा जास्त जवानांनी करेगुट्टा डोंगरात 500 हून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या चक्रव्यूहात कुख्यात कमांडर हिडमा, देवा आणि दामोदर अडकले असून, ऑपरेशन निर्णायक टप्प्यावर आहे.
विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशनने भव्य शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले. दहा विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचा निर्धार व्यक्त करत फाउंडेशनने नव्या स्वप्नांना पंख दिले.
अर्जुनी मध्ये होणार विशेष मार्गदर्शन — परदेशी शिक्षणासाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती, प्रवेश प्रक्रिया, व प्रसिद्ध समुपदेशकांचे मार्गदर्शन एकाच छताखाली!
विलेपार्लेतील जैन मंदिरावर न्यायालयाच्या आदेशावरून केलेली कारवाई आणि त्यानंतर लगेच अधिकाऱ्याची बदली – या घटनेमुळे महापालिका प्रशासन, राजकीय हस्तक्षेप आणि कर्मचाऱ्यांतील असंतोष या तिघांमधील संघर्ष उघड झाला आहे.
सनी देओलच्या ‘जाट’ ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू ठेवली असून, तो लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार आहे. ‘गदर २’ चा ५०० कोटींचा विक्रम मोडण्याची शक्यता आता चर्चेत आहे!
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मरण थांबत नाही. २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत २६९ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. आकडेवारी भीषण असून बीड जिल्ह्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. राज्य शासन काय भूमिका घेणार, हा खरा प्रश्न आहे