गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यातील ग्राम डोंगरगाव कवठा येथे एक ऐतिहासिक आणि भव्य सोहळा संपन्न झाला. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. होमराजजी पुस्तोडे (माजी सभापती, पंचायत समिती अर्जुनी मोर), भालाधरे सर, श्री. योगेशजी नाकाडे, श्री. सुरेंद्रजी ठवरे, श्री. लैलेश्वरजी शिवनकर, श्री. दिलवरजी रामटेके, सौ. सरीताताई लंजे (सरपंच, डोंगरगाव), श्री. धम्मदीपजी मेश्राम, सौ. रेखाताई संग्रामे, श्री. भागवतजी डोंगरवार, सौ. इंदिराताई भंडारी, श्री. मुनेश्वरजी परशुरामकर, श्री. विठ्ठल तागडे, श्री. युवराज नंदागवळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सामाजिक समतेचा संदेश देत लोकांना बौद्ध धम्माच्या शिकवणीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या ऐतिहासिक अनावरणामुळे डोंगरगाव कवठा गावात एक नव्या सामाजिक जाणीवेचा प्रारंभ झाला आहे.
